| |
सांगली जायंटस् चॅरिटेबल संस्था संचालित मूकबधिर मुलांची शाळा सांगली, या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेललन सोमवार दिनांक २८\३\२०११ रोजी सायंकाळी ठीक ४-३० वाजता मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन इंजि. श्री. रोहन मेहता यांचे शुभहस्ते सरस्वती पूजनाने झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. दिलीप नेर्लीकर, खजिनदार श्री. चंद्रकांत पाटील, अॅड. विलासराव पवार संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच संस्थेचे देणगीदार मा. श्री. गोपाळराव गद्रे, ज्येष्ठ नागरीक श्री. माधवराव जोशी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. यामध्ये लावणी, अंधश्रद्धेवर आधारित नाटक, भारूड सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नामदेव घरपणकर यांनी केले. आभार मुख्याध्यापिका सौ. नेहा इनामदार यांनी मानले.
सौ. नेहा मा. इनामदार
मुख्याध्यापिका |